TMC

टायर्स पंक्चर दुकानदारांना आपल्या दुकानासमोर डासांच्या अळ्या निर्माण न होण्याची दक्षता घेण्याची पालिकेची सूचना

दुकानाबाहेर टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर दुकानांबाहेर उघड्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानाच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होत असते. यामुळं शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी उघड्यावर ठेवलेल्या रिकाम्या टायर्समध्ये अथवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचं पाणी साचून त्यामध्ये डास अळी आढळून आल्यास तसंच आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारचे तापाचे रूग्ण आढळल्यास संबंधित दुकानदारांवर आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महापालिकेनं प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी ही सूचना टायर पंक्चर दुकानदारांना दिल्या आहेत. अशा दुकानदारांनी आपल्याकडे अळ्यांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचनाही महापालिकेनं केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *