congress political

म्हाडा वासियांची शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी दिशाभूल केल्याचा विक्रांत चव्हाण यांचा आरोप

समूह विकास योजनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच लोकमान्यनगर, सावरकरनगर मधील म्हाडा वासियांना शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांकडून दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये ठाणे महापालिकेतील शहर विकास विभागाचे अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना नगरसेवकांनी म्हाडा वासियांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेचा एक उपअभियंताही उपस्थित होता. या बैठकीनंतर म्हाडा वासियांना अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. ही सर्व बाब म्हणजे निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. सावरकरनगर म्हाडा ही एलआयजी मधील वसाहत असून तेथील भूखंड हे लॉटरी पध्दतीनं वितरित केले आहेत. अद्याप या चाळीतील संस्थांचे अभिहस्तांतरण झालेलं नाही. तसंच वसाहतीचा ले-आऊट म्हाडानं महापालिकेकडे मंजुरीसाठी सादर केलेला नाही. त्यामुळं चाळीतील रहिवाशांना वितरित केलेले भूखंड हे तीन प्रवर्गात मोडतात. त्यानुसार भूखंडापेक्षा जास्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध नाही. जोपर्यंत वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाचा शासन निर्णय होत नाही आणि म्हाडा त्याबाबत महापालिकेकडे परवानगी मागत नाही. तसंच जोपर्यंत अभिहस्तांतरण होत नाही तोपर्यंत म्हाडामधील वाढीव बांधकामाचे रेग्युलेशन होऊ शकत नाही. त्यामुळं हे पत्रक तसंच घेण्यात आलेली सभा आणि त्यात नगरसेवक आणि महापालिका अधिका-यांची हजेरी ही गंभीर बाब असून म्हाडा वासियांची ही घोर फसवणूक असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *