Bjp political

निरंजन डावखरे यांना स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना स्वाभिमान पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची निरंजन डावखरे यांनी भेट घेतली त्यावेळी स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा देण्याची विनंती त्यांना केली. त्याला प्रतिसाद देत नारायण राणे यांनी डावखरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी डावखरेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *