मुंब्र्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

मुंब्र्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रामध्ये कौसा, चाँदनगर परिसरात कोरोना विषाणु बाबत जनजागृती करण्यासाठी सूचना देत कर्मचारी गस्त घालण्यासाठी फिरत होते. यावेळी दौलतनगर नाका चाँदनगर येथे गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकांची गर्दी दिसुन आली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ येथील नागरिकांना आवश्यकते शिवाय न थांबता घरी निघुन जावे, गर्दी केल्याने संसर्गजन्य रोगाचा फैलाव होवू शकतो याबाबतची माहिती दिली, परंतु अब्दुल गणी ऊर्फ मर्चट आणि डॉ एस एफ रजा यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळी करुन धक्काबुकी केली. शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading