कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनच्या काही सुचना

कोरोना हा अति संसर्गजन्य विषाणू असून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन काही सुचना केल्या आहेत. सध्या देशव्यापी लॉक डाऊन करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपण आपल्या सोसायटी मध्ये कोरोना हा अति संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांना महत्त्वाच्या सूचना द्याव्या. आपल्या सोसायटीतील कोणतेही सदस्य विनाकारण सोसायटी मधून बाहेर पडू नये. सोसायटीमधील कोणत्याही सदस्याला मॉर्निंग वॉक /फेरफटका करिता बाहेर पडू देऊ नये. सोसायटी मधील कोणत्याही सदस्याने आपले पाळीव कुत्रे फिरण्याकरिता बाहेर घेऊन येऊ नये. सोसायटीतील प्रत्येक घरातील एकाच व्यक्तीने अतिमहत्वाच्या कामानिमित्ताने तसेच जीवनावश्यक वस्तू, अगर भाजी व औषधा घेणे करीता बाहेर पडावे. सोसायटीच्या बाहेरील कोणत्याही वाक्तीला सोसायटीच्या आत प्रवेश देऊ नये. सोसायटी मधील कोणत्याही सदस्याने दोन महिन्यांपूर्वी बाहेरच्या देशातून प्रवास केला असेल किंवा त्यांचे कडे कोणतेही नातेवाईक किंवा मित्र हे बाहेरच्या देशातून आले असल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिस स्टेशन व ठाणे महानगर पालिका, कोरोना दक्ष विभाग याना देण्यात यावी. सोसायटी मधील कोणत्याही सदस्याला खोकला ताप जास्त दिवस येत असेल तरी त्यांची माहिती तात्काळ ठाणे महानगर पालिका येथील कोरोना अति दक्षता विभाग यांना देण्यात यावी.सोसायटी मधील कोणत्याही सदस्यास ठाणे विभागाच्या कोरोन विभागाने home quarantine केले असेल तर त्यांना दिलेल्या कालावधीपर्यंत घराचे बाहेर पडू नये, तसेच ते घराच्या बाहेर पडत असतील तर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयषि 25371010 या क्रमांकावर अथवा नौपाडा पोलीस स्टेशनषी 25423300 या क्रमांकावर संपर्क साधवा अस आवाहन करण्यात आल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading