ठाण्यातील सर्व उपहारगृहं आजपासून तीन दिवस बंद

ठाण्यातील सर्व उपहारगृहं आजपासून तीन दिवस बंद ठेवली आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार ठाण्यातील हॉटेल असोसिएशननं स्वयंस्फूर्तीनं हा निर्णय घेतला आहे. ठाणे हॉटेल असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत आजपासून तीन दिवस ठाण्यातील सर्व उपहारगृहं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी तीन दिवस उपहारगृहं बंद राहणार असून सोमवारी परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading