जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी

जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इत्यादींची विक्री करणारी सर्व दुकानं, पानटप-या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धूम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकानं आणि पानटप-यांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणा-यांविरोधात दंडनीय कारवाई होऊ शकते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading