जिल्हा परिषदेचे कर्मचारी संदेश म्हस्के आणि हिरामण खाडे यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषदेचे कर्मचारी संदेश म्हस्के आणि हिरामण खाडे यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असणारे संदेश म्हस्के आणि ग्रामविकास अधिकारी हिरामण खाडे यांना राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार काल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्मचा-यांना दरवर्षी यशवंत पंचायत राज अभियाना अंतर्गत पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. संदेश म्हस्के हे २००० साली कनिष्ठ सहाय्यक पदावर रूजू झाले. सध्या ते जिल्हा परिषद कृषी सभापती यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत. तसंच राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या ठाणे शाखेचे जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत. तर हिरामण खाडे २००४ साली सेवेत रूजू झाले सध्या ते ग्रामपंचायत वाफे येथे ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीनं या दोघांचं अभिनंदन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading