डीजी ठाणेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

ठाणे स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणे उपक्रमाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. डीजी ठाणेची बेस्ट डिजीटल सिटी प्रकल्प म्हणून निवड झाली आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना बेस्ट डिजीटल सिटी प्रकल्प सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. डीजी ठाणेनं राबवलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकरांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. ठाण्यात कोणते उपक्रम राबवणं गरजेचं आहे हे डीजी ठाणेच्या वतीनं करण्यात येणा-या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठाणेकर सुचवत असतात. डीजी ठाणेच्या माध्यमातून विविध आजारावर कशी काळजी घ्यावी याच्या कार्यशाळा, योग प्रशिक्षण शिबीर, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रक्तदानासारखे उपक्रम, शॉपिंग फेस्टीवल, युथ आयकॉनसारख्या स्पर्धा, डीजी मित्र, वेब सेमिनार मालिका असे अनेक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाला मिळणा-या प्रतिसादामुळेच ठाणे स्मार्ट सिटीच्या डीजी ठाणेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading