विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये दोन महिन्यात संचालक दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती

विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये दोन महिन्यात संचालक दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीकरता कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. भौगोलिक अंतरामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचा-यांना मुंबईत येण्यास अडचणी येतात. सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांना सेवा देण्यास मुंबई विद्यापीठ अकार्यक्षम ठरत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी या लक्षवेधीद्वारे आमदार निरंजन डावखरे यांनी केली होती. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा कारभार सुरळीत चालण्यासाठी संचालक दर्जाच्या आयुक्ताची नियुक्ती करावी अशी मागणी डावखरे यांनी केली. त्याला उत्तर देताना स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर पुढील काळात विद्यार्थ्यांच्याही भूमिका जाणून घेण्यात येतील. अभ्यास गटाचा निर्णय होईपर्यंत येत्या २ महिन्यात विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये संचालक दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती केली जाईल असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading