ठाणे परिवहन समितीच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यत्वाच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्यत्वासाठी येत्या ४ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत ७, राष्ट्रवादीनं ४, भारतीय जनता पक्षानं २ तर काँग्रेसनं एकाला उमेदवारी दिली आहे. परिवहन समिती सदस्यत्वासाठी गुप्त मतदानानं निवड होणार आहे. शिवसेनेतर्फे विलास जोशी, पूजा वाघ, बालाजी काकडे, प्रकाश कोटवानी, तानाजी पाटील, मिलिंद मोरे आणि राजेंद्र महाडीक अशा ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीतर्फे नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसिन शेख आणि शमीम खान, भारतीय जनता पक्षातर्फे सुरेश कोलते आणि विकास पाटील तर काँग्रेसतर्फे राम भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading