उपनगरीय गाड्यांमध्ये महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी पकडलं

उपनगरीय गाड्यांमध्ये महिला डब्यात महिलांचे मोबाईल लांबवणा-या दोघा अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलीसांनी रंगेहात पकडलं आहे. हाजरा शेख या मुंब्रा स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या धिम्या गाडीत चढत असताना १५ वर्षीय मुलानं त्यांच्या पर्समधून मोबाईल लांबवला. मोबाईल चोरी होत असताना सतर्क झालेल्या हाजरा यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्यानं फलाटावरील तैनात रेल्वे पोलीसांनी चोरट्या मुलाला पकडलं. तर दुस-या घटनेत अर्विना शेख या मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या गाडीत चढत असताना संधी साधून अल्पवयीन चोरट्यानं त्यांच्या पर्समधील १० हजार रूपयांचा मोबाईल हिसकावला. आपला मोबाईल कोणीतरी हिसकावत असल्याची जाणीव झाल्यानं त्यांनी आणि इतर सहप्रवाशांनी चोरट्याला पकडून लोहमार्ग पोलीसांच्या हवाली केलं. या दोन्ही मुलांची रवानगी बालसुधारगृहात झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading