झाडावरून पडल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या माकडाच्या मादीचे पिल्लू आता ठणठणीत

झाडावरून पडल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या माकडाच्या मादीचे पिल्लू आता ठणठणीत झालं आहे. येऊर येथील रवि इस्टेट भागात २ फेब्रुवारीला माकडीण आणि तिचे पिल्लू मोठ्या उंचीवरून पडलं होतं. या घटनेत माकडीणीचा मृत्यू झाला मात्र आईला पिल्लू घट्ट बिलगून राहिल्यानं पिल्लू सुदैवानं बचावलं होतं. पण दोन दिवसाच्या या पिल्लाला आईचं दूध आणि ऊब न मिळाल्यानं त्याची प्रकृती खालावली होती. मात्र या पिल्लाचा वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या मानसी नथावणी यांनी सांभाळ केल्यानं आता हे पिल्लू ठणठणीत झालं आहे. सुरूवातीला काही दिवस तर त्या पिल्लाला २४ तास आपल्या कुशीत घेऊन राहत होत्या. नंतर या पिल्लाला कृत्रिम ऊबही देण्यात आली. सध्या या पिल्लाची प्रकृती सुधारत असून आता ते दूधही पिऊ लागलं असल्यामुळं हे पिल्लू चांगलंच खेळू बागडू लागलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading