समीर महाजन याला बांधकाम व्यावसायिक हसमुख शहा यांच्याकडून १ लाख रूपयांची खंडणी स्वीकारताना अटक

समीर महाजन याला बांधकाम व्यावसायिक हसमुख शहा यांच्याकडून १ लाख रूपयांची खंडणी स्वीकारताना अटक झाली असून आता पोलीसांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. बांधकाम व्यावसायिक हसमुख शहा यांचं एकदंत हौसिंग हे कार्यालय अनधिकृत असल्याच्या संदर्भात समीर महाजन आणि बंटी सिंग या दोघांनी महापालिकेत तक्रार करून कारवाई करण्यासंदर्भात धमकावलं होतं. ही कारवाई होऊ नये असं वाटत असेल तर २० लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रूपये ठरवण्यात आली. त्यानंतर १५ लाखातील १ लाख रूपये स्वीकारताना हसमुख शहा यांच्या कार्यालयात समीर महाजनला नौपाडा पोलीसांनी १४ फेब्रुवारीला रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. महाजनचा दुसरा साथीदार बंटी सिंग याला अटक करायची असल्यानं त्याच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ झाली होती. आज न्यायालयानं त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तर या प्रकरणातील बंटी सिंग अद्याप फरार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading