माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न २९ फेब्रुवारीपर्यंत सोडविणार

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर २९ फेब्रुवारी पर्यंत तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिलं आहे. भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांवर दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विना अनुदानित आणि अनुदानित तुकड्यांचे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवणे, शिक्षकेतर कर्मचा-यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करणं, अल्पसंख्याक संस्थातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना पदोन्नती देणं, विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळेचे प्रस्ताव मार्चपर्यंत मंजूर करणं, महिलांना बालसंगोपनाची रजा मंजूर करण्याबाबत शिक्षण संस्थांना पत्र पाठवणं, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पदांना मंजुरी देणं, विविध शाळांमधील प्रलंबित वैयक्तीक मान्यतेच्या प्रस्तावांना मान्यता देणं असे निर्णय या सभेत घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी पर्यंत केली जाईल असं आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी दिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading