शिवजयंती उत्साहानं साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शासकीय जयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरुन वाद आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनं शिवजयंती साजरी करतात. तर शासनाच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला असल्यामुळे शासकीय पातळीवर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी होत असल्यामुळे आणि यात शिवसेना तसेच शिवप्रेमी मंडळींचा सहभाग नसल्यानं शिवजयंतीत तितकासा उत्साह दिसत नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृह ते मासुंदा तलाव अशी एक रॅली काढण्यात आली होती. आज दिवसभर छत्रपती शिवाजी महारांजाचं छायाचित्र असलेले भगवे झेंडे लावून रिक्षाचालक आणि दुचाकीधारक महाराजांचा गजर करताना दिसत होते. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading