railway

ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. देशातील पहिली रेल्वे १६५ वर्षापूर्वी बोरिबंदर ते ठाणे अशी धावली होती. त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानक हे एक ऐतिहासिक ठेवा आहे. याची माहिती पुढील पिढीला रहावी यासाठी त्या रेल्वेच्या इंजिनाची प्रतिकृती ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठेवण्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे आमदार संजय केळकर यांनी मागणी केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या पाठोपाठ पियुष गोयल यांनीसुध्दा याला मान्यता दिली असली तरी प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. देशातील पहिली रेल्वे धावली त्याला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रेल्वे प्रवासी संघानं ठाणे रेल्वे स्थानकात आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा केला. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसंच मिठाईही वाटण्यात आली. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच रेल्वे संघटनांसाठी काम करणा-या महिलांचा यावेळी आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *