नवीन मतदार नोंदणी आणि दुरूस्तीसाठी मुदतवाढ

निवडणूक आयोगानं नवीन मतदार नोंदणी आणि दुरूस्तीसाठी मुदत वाढवली आहे. १३ मार्च ते १५ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दावे हरकती स्वीकारल्या जाणार असून १५ मे ला मतदारांची अंतिम यादी प्रसिध्दीस दिली जाणार आहे. शनिवार २८ आणि रविवार २९ मार्च, शनिवार ११ एप्रिल आणि रविवार १२ एप्रिल या दिवशी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्याकरिता उपस्थित राहणार आहे. १ जानेवारी २०२० रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणा-यांनी मतदारयादीत आपल्या नावाची नोंद करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading