संस्कार संस्थेच्या हुरडा महोत्सवाला मोठा प्रतिसाद

संस्कार संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हुरडा महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या हुरडा महोत्सवाला ५ हजाराहून अधिक ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. या महोत्सवात हुरड्याबरोबर गावरान थाळीचाही आस्वाद ठाणेकरांनी लुटला. या गावरान थाळीत २ ज्वारीच्या भाक-या, वांग्याचं भरीत, पिठलं, मिरचीचा ठेचा, गूळ, शेंगदाणा चटणी असा बेत होता. या महोत्सवाचं उद्घाटन पोलीस उपायुक्त डी सी अंबुरे यांच्या हस्ते झालं. तर कमल केळकर यांच्या हस्ते पांडव पूजन करण्यात आलं. तर मानाची आगटी पेटवून महोत्सवाला सुरूवात करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात डिसेंबर सुरू झाला की शेतात आगटी पेटवून पांडव पूजा करून हुरडा खाण्यास सुरूवात होते. थेट शेतावरील हुरडा खाण्यास मिळाल्यामुळं ठाणेकरांना एक वेगळा आस्वाद मिळाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading