TMC

एलईडी दिव्यांमुळे ठाणे महापालिकेची वार्षिक ३ कोटींची बचत

वीज बचतीच्या उपाययोजना राबवण्यात अग्रेसर राहिलेल्या ठाणे महापालिकेनं एलईडी दिव्यांचा वापर करून दरमहा सरासरी ४ कोटी ८४ लाख युनिट वीजेची बचत केली आहे. यामुळं महापालिकेची प्रतिवर्षी ३ कोटींची बचत होणार आहे. यापुढे सोडीयम व्हेपर दिव्यांऐवजी सर्वत्र एलईडी दिवे लावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी विद्युत विभागाला दिले आहेत. वीज संवर्धनासाठी ठाणे महापालिका कायम प्रयत्नशील असून महापालिकेला याबाबत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. वीज बचतीसाठी गेल्यावर्षीपासून ठाण्यातील रस्त्यांवर सोडीयम व्हेपर दिव्यांऐवजी उर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळं महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते चंदेरी प्रकाशानं उजळले असून या दिव्यांच्या वापरानं वीज बीलातही मोठी बचत झाली आहे. महापालिकेनं ३८ हजार सोडीयम व्हेपर दिव्यांपैकी एस्को प्रकल्पांतर्गत साडेसात हजार एलईडी दिवे लावले असून महापालिकेच्या भांडवली निधीतून १४ हजार एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळं पथदिपांच्या वीज बिलामध्ये सरासरी ४ कोटी ८४ लाख वीज युनिटची बचत झाली असून त्यापोटी वार्षिक सरासरी ३ कोटीपेक्षा जास्त रक्कमेची बचत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *