महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्याची अशोक वैतींची मागणी

महापालिकेच्या महिला कबड्डी संघातील स्पर्धकांना राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडील अध्यादेशानुसार ५ टक्के आरक्षित जागेवर महापालिकेत सामावून घ्यावं अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी महापौरांकडे केली आहे. ठाणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेत महिलांचा संघ विजेता ठरला होता. महापालिका कबड्डी संघात राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डी पटूंचा समावेश आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कबड्डीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना राज्य शासनाच्या सेवेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग २ आणि ३ या पदावर थेट सामावून घेतलं जातं. शासनाच्या धोरणानुसार महापालिकेच्या महिला कबड्डी संघात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत. या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेत सामावून घ्यावं अशी मागणी अशोक वैती यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading