जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना पदोन्नती आणि सेवा पुनर्विलोकनाचा लाभ

सातव्या वेतन आयोगानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पदोन्नती आणि सेवा पुनर्विलोकन लाभ असे विविध लाभ देण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेनं सामान्य प्रशासन विभागाच्या ८ संवर्गातील ज्या वर्ग ३ आणि ४ कर्मचा-यांची सेवा १०, २० आणि ३० वर्ष पूर्ण झाली आहे अशा ३६३ कर्मचा-यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला आहे. तर वित्त विभागातील ४० कर्मचा-यांना हा लाभ देण्यात आला आहे. यामुळं कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीत वाढ होणार आहे. प्रशासन विभागातील ६ कर्मचा-यांना प्रत्यक्ष पदोन्नतीचा लाभ तर सेवानिवृत्त झालेल्या ६ कर्मचा-यांना १२ आणि २४ वर्षाचा लाभही मिळाला आहे. याशिवाय ज्या कर्मचा-यांचे वय ५४ किंवा ज्यांची सेवा ३० वर्ष झाली आहे अशा कर्मचा-यांच्या सेवेचं पुनर्विलोकन केलं जातं अशा ४४ कर्मचा-यांची सेवा पुनर्विलोकीत करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading