वेगानं जाणा-या घंटागाडी खाली येऊन एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे महापालिकेची घंटागाडी वागळे इस्टेट येथील कामगार नाक्यावरून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात माजिवडा येथे राहणारे अनिल देहेरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिल देहेरकर हे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. ते कामावर जात असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या मागे मुलगा आणि बायको असा परिवार आहे. पोलीसांनी घंटागाडीच्या चालकाला अटक केली आहे.