ठाणे मतदाता जागरण अभियान विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून भेट नाकारल्यास निदर्शनं करणार

ठाणे मतदाता जागरण अभियानानं समूह विकास योजनेबाबत विविध मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं ठरवलं असून मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यास निदर्शनं करण्याचा इशाराही दिला आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. समूह विकास योजनेत ३२३ चौरस फूटाचं घर मोफत आणि मालकी हक्काचं मिळावं, त्यासाठी अध्यादेश काढावा, या योजनेतील सर्व प्रकल्प रेरा कायद्याखाली असावेत, पहिल्या जीआरची तारीख ५ जुलै २०१७ करावी, या योजनेमध्ये ज्या रहिवाशांना घर दिलं जाणार आहे त्यांच्या राहत असलेल्या घराची मोजणी करून त्याचे नाव, सर्वे नंबर, पत्ता असा तपशील असलेले मालकी हक्काचे घर मिळेल असं हमीपत्र महापालिकेनं द्यावे, या योजनेचा पूर्ण आराखडा द्यावा, बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्यायी निवारा मिळाल्याशिवाय इमारत तोडू नये, हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी, बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका असा त्रिपक्षीय असावा आणि त्याशिवाय घर रिकामे करू नये, समूह विकास योजनेत छोटे व्यापारीही विस्थापित होणार असल्यामुळं अशा व्यावसायिकांसाठी ट्रान्झिट बाजार निर्माण करण्यासाठी जागा द्यावी, या योजनेत स्वयंपूर्ण विकास करू इच्छिणा-यांना अर्थसहाय्य आणि अन्य कायदेशीर मदत द्यावी अशा मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेट नाकारल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणीच निदर्शनं करण्याचा इशारा ठाणे मतदाता जागरण अभियानानं दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading