ए के जोशी इंग्रजी शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा लुटला आनंद

आनंदीबाई केशव जोशी म्हणजे ए के जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटला. मुलांना स्वावलंबी करण्यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे एक रात्र मुलांचा शाळेत मुक्काम. १ फेब्रुवारीला सिनियर केजीतील मुलांनी असा शाळेत मुक्कामाचा अनुभव घेतला. संध्याकाळी ७ च्या सुमारास अंथरूण, पांघरूण आणि रात्रीचे कपडे भरलेली बॅग घेऊन सर्व मुलं शाळेत हजर झाली. शाळेत रात्रीचा मुक्काम करायचा असल्यानं प्रथमच सकाळी येण्याऐवजी मुलं संध्याकाळी शाळेत आली. या मुलांना नंतर शाळेच्या पटांगणात नेण्यात आले. यावेळी मुलांनी नृत्य आणि गाणी सादर केली. यावेळी मुलांचे काही खेळही घेण्यात आले. जेवणाच्या वेळेस मुलांना पुरी, बटाटा भाजी आणि श्रीखंड असं जेवण देण्यात आलं. त्यानंतर शाळेच्या पटांगणात शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटीचा आनंद मुलांनी लुटला. शेकोटीभोवती फेर धरून मुलांनी गाणीही म्हटली. रात्री साडेदहा वाजता मुलांना पुन्हा वर्गात नेण्यात आलं. रात्रीचे कपडे घालून शिक्षकांच्या मदतीनं अंथरूणं टाकून मुलं शाळेतच झोपी गेली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही मुलं उठली. अंथरूणांची आवराआवर करून सकाळी सात वाजता मुलं पालकांसोबत आपल्या घरी गेली. एका रात्रीचा शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटल्याचं मुलांच्या चेह-यावर जाणवत होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading