कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात

कोकण इतिहास परिषदेचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ महाविद्यालयात होणार आहे. या अधिवेशनाचं अध्यक्षपद राज्याचे माजी संचालक पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय डॉ. अरविंद जामखेडकर भुषवणार आहेत. कोकणातील आदिम ते नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. यावर्षी सुप्रसिध्द नाणेतज्ञ शशिकांत धोपाटे यांना मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तर भारतीय नौकानयनाचा इतिहास या डॉ. द. रा. केतकर यांच्या संशोधन ग्रंथास पुरस्कार दिला जाणार आहे. कोकणात इतिहास विषयक कामगिरी करणा-या विशेष व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार साडेचारशेच्या वर किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती करणा-या हमिदा अन्वर खान यांना दिला जाणार आहे. नवव्या राष्ट्रीय अधिवेशनात झालेल्या पुस्तकाचं प्रकाशन या अधिवेशनात केलं जाणार आहे. या अधिवेशनात छायाचित्र प्रदर्शन, ग्रंथदालन, पुस्तक विक्री स्टॉल आणि भारतीय दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading