राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त कल्याणमध्ये १०१ वर्षाच्या आजीसह साडेदहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घातले सामुहिक सूर्यनमस्कार

कल्याणमध्ये राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधत सुमारे साडेदहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार घातले. कल्याण-डोंबिवली महापालिका, महिला आणि बालकल्याण समिती आणि सुभेदार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणमधील ५४ विविध शाळांतील सुमारे साडेदहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सुभाष मैदानावर सामुहिक सूर्यनमस्कार घालून एक विक्रम नोंदवला. रोज ८० सूर्यनमस्कार घालणा-या रत्नागिरीतील १०१ वर्षाच्या आजी लक्ष्मीबाई दामले यांनीदेखील विद्यार्थ्यांसमवेत सूर्यनमस्कार घातले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading