आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी

ठाणे अग्निशमन दलाचा एक कर्मचारी काल मुंब्रा इथे आग विझवताना जखमी झाला. मुंब्र्यातील मोमीन अपार्टमेंटमध्ये काल आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी गेलेला मोईन शेख हा अग्निशमन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली. ही आग विझवण्यासाठी दोन फायर इंजिन पाठवण्यात आली होती. फायरमन मोईन शेख हा शीघ्र कृती वाहनावर होता. शेख हा जेट ऑपरेट करत असे. आग विझवताना शेख पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली. सुरूवातीला त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्याला केईएम रूग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading