ठाण्यामध्ये महानगर गॅस वाहिनी फुटल्यामुळे काही काळ गोंधळ

ठाण्यामध्ये महानगर गॅस वाहिनी फुटल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. नौपाड्यामध्ये रस्ता रूंदीकरणाचं काम सुरू असून या कामादरम्यान काल दुपारी चारच्या सुमारास महानगर गॅसच्या वाहिनीला जेसीबी मशिनचा धक्का लागून पाईपमधून गॅस गळती सुरू झाली. बराच वेळ ही गळती सुरू होती. महानगर गॅस कंपनीचं पथक घटनास्थळी आल्यानंतर ही गॅस गळती बंद करण्यात आली. यामुळं जवळपास दीड हजार घरांचा गॅस पुरवठा काही काळ बंद ठेवावा लागला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading