जिल्हा सामान्य रूग्णालयाला सर्वात जास्त कुटुंब नियोजन करणारी संस्था म्हणून पुरस्कार

कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या संस्था, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि सर्वोत्कृष्ट समुपदेशन करणारी संस्था यांना जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जिल्हा सामान्य रूग्णालयाला सर्वात जास्त कुटुंब नियोजन करणारी संस्था, भिवंडी उपजिल्हा रूग्णालयाला सर्वाधिक डोसेस प्रदान करणारी संस्था, समुपदेशन कोपरा म्हणून उल्हासनगर ४ च्या शासकीय प्रसुतीगृहाला गौरवण्यात आलं. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डॉ. ऋतुजा पाटील, स्टाफ नर्स म्हणून सविता पाटील आणि स्नेहलता जाधव यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading