Social

सिग्नल शाळेची मुलं प्रादेशिक परिवहन विभागाचे सदिच्छा दूत म्हणून काम करणार

तीन हात नाका सिग्नलवर कधी काळी भिक्षेकरी म्हणून ओळखली जाणारी मुलं आता त्याच सिग्नलवर आरटीओचे सदिच्छा दूत म्हणून रस्ता सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करणार आहेत. या मुलांना पोलीसांसारखा गणवेषही दिला जाणार असून उद्या एका कार्यक्रमात रस्ता सुरक्षा अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा नियमांबाबत होणारी जनजागृती अनेकदा औपचारीक होऊन जाते. ही कमतरता दूर करण्यासाठी ही कल्पक योजना आखण्यात आली आहे. वाहन चालकांना सुरक्षा नियम पाळण्याबाबतचे शुभेच्छा पत्र आणि दुस-या बाजूला रस्ता सुरक्षा नियम असं पत्र दिलं जाणार असून दर मंगळवारी तीन हात नाका सिग्नल येथे हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी सिग्नल स्कूल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Comment here