भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड

ठाणे शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्ष पदासाठी निरंजन डावखरे यांच्या विरोधात कुणीच अर्ज न दाखल केल्यामुळं त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे कोकण प्रभारी आणि निवडणूक अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांना अध्यक्ष पदाचं पत्र देण्यात आलं. २०२२ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुका या निरंजन डावखरे यांच्या अध्यक्ष पदाखाली लढल्या जाणार आहेत. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू अशी घोषणा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading