TMC

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत उद्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ लसीकरण

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत उद्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. प्रत्येक विभागातील आरोग्य केंद्रात ही लस मोफत दिली जाणार असून त्याचा लाभ ५ वर्षापर्यंतच्या बालकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. १३ जानेवारी २०११ नंतर पोलिओचा रूग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं भारतास पोलिओ मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. मात्र भारताच्या आजूबाजूच्या काही देशात पोलिओचे रूग्ण आढळले असून त्यामुळं या विषाणूंचा पुन्हा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उद्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना आणि नियमित लसीकरणांतर्गत १ वर्षापर्यंतच्या बालकांना बीसीजी, ट्रिपल, पोलिओ, गोवर, काविळ, पेंटावॅलेट, अ जीवनसत्वाची मात्रा अशा लसी द्याव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

Comment here