crime

आंबिवलीत राहणा-या एका मजुराला १ कोटीचा टॅक्स भरण्याची नोटीस

आंबिवलीत राहणा-या एका मजुराला १ कोटीचा टॅक्स भरण्याची नोटीस आयकर विभागानं पाठवली आहे. नोटबंदीच्या काळात त्यानं आपल्या खात्यात ५८ लाख रूपये भरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भाऊसाहेब अहिरे हा मजुरीचं काम करत असून त्याचं रोजचं उत्पन्न ३०० रूपये आहे. तो आपल्या सास-याच्या आंबिवली येथील घरात पत्नी आणि मुलांबरोबर गेल्या ६ वर्षापासून राहतो. त्याला सप्टेंबर महिन्यात आयकर विभागाची नोटीस मिळाली. त्यानंतर पुन्हा ७ जानेवारीला १ कोटी ५ लाख रूपयांचा कर भरण्याची नोटीस मिळाली. पहिल्या नोटीसीनंतर त्यांनी बँकेत माहिती घेतली असता त्यांच्या पॅनकार्डवर दुस-याचं छायाचित्र लावून बनावट स्वाक्षरीद्वारे अकाऊंट उघडण्यात आल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी त्यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comment here