कळवा रूग्णालयावर उभारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पावरून वाद

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय या ना त्या कारणानं नेहमी वादाच्या भोव-यात असतं. आताही रूग्णालयाच्या वरती उभारण्यात येत असलेल्या सौर उर्जा प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. या रूग्णालयाच्या वरती सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. पण गेली अनेक वर्ष हे काम झालेलं नाही. आता हे काम करणा-या ठेकेदाराला २ कोटी रूपये आगाऊ देण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नात ही बाब उघड झाली आहे. संजीव दत्ता हे गेली ५ ते ६ वर्ष या प्रकल्पाविरोधात तक्रार करत आहेत. यासंदर्भातच त्यांनी माहिती अधिकारात काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकल्पाचं काम ठेकेदारानं पूर्ण न केल्यामुळं त्याला दंड ठोठावण्यात आल्याची बाबही माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. संजीव दत्ता यांनी या ठेकेदाराला आत्तापर्यंत किती पैसे देण्यात आले अशी माहिती विचारली होती. यामध्ये पालिका प्रशासनातर्फे त्याला २ कोटी रूपये देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच डोळे बंद करून हा व्यवहार झाल्याचं दिसत असून आता हे पैसे कसे वसूल करणार असा प्रश्न संजीव दत्ता यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading