भिवंडी महापालिकेच्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनातर्फे १० कोटींचा निधी

भिवंडी महापालिकेच्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनातर्फे १० कोटींचा निधी दिला जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह देखभाल दुरूस्ती अभावी गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची बाब लक्षात आल्यावर नगर विकास विभागाला १० कोटी रूपयांचा निधी देण्याचे आदेश दिले आहेत. युती सरकारच्या काळात या नाट्यगृहाची उभारणी झाली. काळाच्या ओघात आता नाट्यगृहाच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठा खर्च येणार असून महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेला हा खर्च करणं शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन राज्य सरकारकडून तातडीनं १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. महापालिका आयुक्तांकडून नगरविकास मंत्र्यांनी दुरूस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतली आणि तातडीनं १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करत असल्याचं त्यांना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading