fire

होली क्रॉस शाळेसमोरील समर्थ आर्केड इमारतीला आग – जिवितहानी नाही

होली क्रॉस शाळेसमोरील समर्थ आर्केड या इमारतीला आज सकाळी आग लागली होती. सुदैवानं या आगीत जिवितहानी झाली नाही. होली क्रॉस शाळेसमोर समर्थ आर्केड ही सहा मजली इमारत असून या इमारतीतील पाचव्या मजल्यावर संजय भालेराव यांच्या कार्यालयात ही आग लागली होती. संजय भालेराव हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आगीचं वृत्त समजताच पोलीस, महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं या ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलाचे २ बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. या आगीत सुदैवानं कोणतीही हानी झाली नसली तरी अग्निशमन दलाचे चंद्रकांत डवले हे जवान या आगीत जखमी झाले आहेत. या इमारतीतच डॉ. संजय घोलप यांचं पहिल्या माळ्यावर प्रथमेश नर्सिंग होम आहे. या रूग्णालयात दोन रूग्ण आणि दोन लहान बाळांवर उपचार सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकानं २ रूग्ण, २ लहान बाळं, त्यांचे नातेवाईक आणि २ कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलवलं. ही आग संजय भालेराव यांच्या कार्यालयात लागली होती. रूग्णालयात आग लागली नव्हती. पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि नंतर या इमारतीला सिल ठोकण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *