crime

रजनी पंडीत यांना अखेर जामीन

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात अटकेत असलेल्या महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेकवेळा जामिनासाठी न्यायालयात अर्ज करूनही रजनी पंडीत यांना जामीन मिळत नव्हता. अखेर ३८ दिवसानंतर पंडीत यांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. भैसारे यांनी जामीन मंजूर केला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं २ फेब्रुवारी रोजी रजनी पंडीत यांना अटक केली होती. पंडीत यांच्या घरातून पोलीस पथकाला अनेक सीडीआर मिळाले होते. पंडीत यांना अटक झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आलं होतं. पोलीसांनी रजनी पंडीत यांच्या जामिनाला विरोध केला होता. अखेर ३८ दिवसानंतर काल रजनी पंडीत यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली. वकील पूनम जाधव यांनी त्यांची बाजू मांडली. न्यायालयानं काही अटी-शर्थींवर त्यांना जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *