crime

अंबरनाथ तालुक्यातील भालगाव येथे साडेबारा लाखांचा तब्बल ८३ किलो गांजा हस्तगत

अंबरनाथ तालुक्यातील भालगाव येथे साडेबारा लाखांचा तब्बल ८३ किलो गांजा ठाणे पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हस्तगत केला आहे. अंबरनाथ तालुक्यातील भालगाव येथे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी एका गाडीतून ८३ किलो गांजा जप्त केला. पोलीसांनी गांजाचा हा सर्व साठा आणि इंडिका गाडी जप्त केली असून या गांजाची किंमत बाजारभावानुसार साडेबारा लाख रूपये असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी भिवंडीतील सुरेश पवार आणि प्रेमनाथ भोईर तसंच दिवेश वायले अशा तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *