Bjp govt political

राज्यातील सर्वच असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यरत होईल – कामगार मंत्र्यांचं आश्वासन

राज्यातील सर्वच असंघटित कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाचा मसुदा तयार असून लवकरच हे मंडळ कार्यरत होईल असं आश्वासन कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी दिलं. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नातून राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत निलंगेकर-पाटील यांनी हे आश्वासन दिलं. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचं काम, करावे लागणारे कष्ट, व्यवसायात येणा-या अडचणी याविषयी सविस्तर माहिती दिली आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी केली. कामगार मंत्र्यांनी यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करावेत, याबाबत अंतिम धोरण ठरवून हा प्रश्न मार्गी लावावा असं आमदार संजय केळकर यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. कामगार मंत्री निलंगेकर-पाटील यांनी या मंडळांतर्गत राबवण्यात येणा-या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगळी सल्लागार समिती स्थापन करून वेगळा निधी देण्यात येईल असं आश्वासन कामगार मंत्र्यांनी यावेळी दिलं. वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगारांना दिल्या जाणा-या सुविधा देण्यात येतील, यामध्ये अपघात विमा संरक्षण, कुटुंबातील सदस्यांनाही मेडीक्लेम, घरकुल योजना, पेन्शन योजना अशा सुविधा देण्याचं आश्वासन दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *