social

मोर्च्यातील सहभागी शेतक-यांना शिवसेना- मनसेकडून सोयी सुविधा

शेतक-यांच्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी विधानसभेवर धडक देण्यासाठी निघालेला मोर्चा शनिवारी रात्री ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे धडकला. ठाण्याच्या वेशीवरून मोर्चाने कूच केल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या मोर्चेक-यांसाठी शिवसेना तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सोयीसुविधा पुरवल्या होत्या. ६ मार्च पासून नाशिकहून हा मोर्चा मुंबईकडे निघाला. मोर्चातील सहभागी शेतक-यांच्या डोक्यावर असलेल्या लाल टोप्यांमुळे रस्ते लाल झाल्याचं दिसत होतं. गावोगावी जनतेकडून मिळणा-या शिध्यावर मोर्चेकरी गुजराण करत मुंबईकडे कूच करत होते. ठाण्यात विसावलेल्या शेतक-यांच्या या विराट मोर्चासाठी पालकमंत्र्यांनी विविध सोयीसुविधा पुरवल्या होत्या. पोलीस तसंच वैद्यकीय सेवेसाठी ५ रूग्णवाहिकांसह डॉक्टरांचं पथकही तैनात करण्यात आलं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२ टँकर ठेवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *