political shivsena

पातलीपाडा येथील जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्कच आणि २ पादचारी पूलांचं उद्या लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या पातलीपाडा येथील जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्कचा आणि २ पादचारी पूलांचं उद्या लोकार्पण होणार आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्क प्रकल्पात ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, मासुंदा तलाव, ऐतिहासिक कारागृह, मासुंदा तलावावरील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, गडकरी रंगायतन, मुंबई ते ठाणे धावलेली पहिली रेल्वे, जुने ठाणे बंदर, गणपती विसर्जन थीम, जुने ठाणे आरमार यांना उजाळा देणा-या प्रतिकृती निर्माण करण्यात आल्या आहेत. घोडबंदर परिसरात राहण्यास येणा-या नवीन ठाणेकरांना जुन्या ऐतिहासिक ठाण्याचं महत्व कळावं यासाठी थीम पार्क उभारण्यात आलं आहे. घोडबंदर परिसरातील वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग इन, आर मॉल, ब्रह्मांड, वाघबीळ, कासारवडवली, भाईंदरपाडा, ओवळा आणि गायमुख येथे पादचारी पूल उभारण्याची मागणी केली होती. त्यापैकी विहंग इन येथील पादचारी पूलाचं काम पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण उद्या होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *