political RPI

सत्ताधा-यांकडून गण परंपरेतील लोकशाही उलथवून टाकण्याचा डाव – अंजली आंबेडकर

सत्ताधा-यांकडून गण परंपरेतील लोकशाही उलथवून टाकण्याचा डाव असल्याचा आरोप अंजली आंबेडकर यांनी ठाण्यात बोलताना केला. भारिप बहुजन महासंघ आणि गटई चर्मकार समाज संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात त्या बोलत होत्या. या देशामध्ये सर्वात प्रथम क्रांतीची बीजं बुध्दांनी रोवली. सम्राट अशोक, संत रविदास, शिवाजी महाराज, ज्योतीराव फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्दांच्या समतावादी विचारधारेवर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या विचारधारेला आत्ताचे सत्ताधारी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र बंदमुळे आंबेडकरी जनतेच्या मनात असलेला राग काही अंश शांत झाला आहे. पण हा शांत झालेला राग उफाळू नये यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत. सध्या संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. संविधान बदलणे म्हणजे काय तर या देशात असलेली लोकशाही संपवणं अशी टीका अंजली आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *