दिवा येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास गावक-यांचा पुन्हा विरोध

दिवा येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरांवर महापालिकेनं केलेल्या कारवाईस रहिवाशांनी घेराव घालून तीव्र विरोध केला. दिवा येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर न्यायालयानं कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ९ डिसेंबरला कारवाई करण्यात येणार होती. पण त्यावेळीही रहिवाशांच्या विरोधामुळं कारवाई बारगळली होती. या शासकीय जमिनीवर साधारणत: ३०० घरं बांधण्यात आली आहेत. महापालिकेनं आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता रहिवाशांनी घेराव घालून या कारवाईला विरोध केला. त्यामुळं महापालिकेला पुन्हा एकदा कारवाई करता आली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading