अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं

अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून अंगणवाडी कर्मचा-यांनी निदर्शनं केली. अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्यावा, मोबाईल कंपन्यांनी वाढ केलेल्या दरानुसार मोबाईल रिचार्जचे पैसे मिळावेत, मोबाईल तुटला, हरवला तर त्याचे पैसे अंगणवाडी कर्मचा-यांकडून घेऊ नयेत, अंगणवाडीच्या कामासाठी देण्यात आलेल्या मोबाईलऐवजी टॅब देण्यात यावे, अंगणवाडी लाभार्थ्यांच्या अमृत आहार योजनेअंतर्गत खर्च झालेले जुलै २०१९ पासूनचे पैसे अंगणवाडी कर्मचा-यांना त्वरीत द्यावेत, अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी सेवानिवृत्तीची रक्कम मिळावी, रिक्त पदांवर अंगणवाडी सेविका मदतनीसांची अथवा मुख्य सेविकांची नियुक्ती करावी, ज्या मदतनीसांकडून सेविकेच्या पदाचे काम करून घेतले जात आहे त्यांना सेविकेच्या पदाचे मानधन मिळावे, मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित अंगणवाडी सेविकेएवढे मानधन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे परिधान केले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading