कांदळवनावरील अतिक्रमणांबाबत अधिकारी भूमाफिया मोकळे कसे – मनोहर डुंबरे

बाळकूम येथील कांदळवन क्षेत्रातील झोपड्यांमधील रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र अशा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणा-या महापालिका अधिका-यांबरोबरच भूमाफीया मोकळे कसे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी सर्वांवर गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर सरकार आणि महापालिकेच्या मालकीचे भूखंड संरक्षणाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी डुंबरे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बाळकूम येथील कांदळवनावर उभारलेली भंगारची गोदामं, पक्की घरं आणि झोपड्या महसूल विभागानं जमिनदोस्त केल्या. तेथील रहिवाशांवर पर्यावरणाच्या -हासाचा गुन्हा नोंदवण्यात आला त्याला डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे. या भागातील भूमाफीया, महसुल विभागाची यंत्रणा, शहरातील अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असलेले अधिकारी आणि अतिक्रमण विभागाकडून कांदळवनावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या भागात गटारं, पायवाटा, पाणी पुरवठा अशा सुविधा पुरवल्या गेल्या. महावितरणनं वीज पुरवठा केला त्यामुळं चोर सोडून संन्याशाला फाशी न देता बेजबाबदार महसुल आणि महापालिका अधिका-यांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading