राम मंदिर २०२२ मध्ये पूर्ण होणार – सुब्रमण्यम् स्वामी

देशामध्ये राम मंदिर २०२२ मध्ये बांधून पूर्ण होईल असं खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं. श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थेतर्फे आयोजित नवचैतन्य व्याख्यानमालेत राष्ट्रपुरूष श्रीराम या विषयावर व्याख्यान देताना सुब्रमण्यम् स्वामी यांनी राम मंदिर २०२२ मध्ये पूर्ण होईल असं सांगितलं. राम मंदिरासाठी झालेल्या लढ्यात सुब्रमण्यम् स्वामी यांनी मोठी भूमिका बजावली आहे. राम मंदिराचा शीलान्यास येत्या रामनवमीला म्हणजे २ एप्रिलला होणार असून २०२२ पर्यंत मंदिर बांधून पूर्ण होईल असं स्वामी यांनी सांगितलं. यावेळी राम मंदिराच्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांचा कसा प्रवेश झाला याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता न्यायालयानं राम मंदिरावर आपला निर्णय दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading