बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलं दत्तक

घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतलं आहे. येऊर येथे काही दिवसांपूर्वी एक बिबळ्याचा बछडा आढळला होता. सकाळी फिरायला येणा-या मंडळींना तो दिसल्यानंतर काहींनी ही बाब वन विभागाला कळवली आणि आईविना असलेल्या बिबळ्याला वन विभागानं आपल्या ताब्यात घेतलं. वन विभागातर्फे या बिबळ्याच्या आईशी भेट घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळं वन विभागातर्फे आईपासून हरवलेल्या या बिबळ्याच्या बछड्याचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सांभाळ केला जात होता. आता त्याच्या पुढील आयुष्याचा खर्च आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे. आज एका कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबियांनी या बिबळ्याच्या बछड्याला दत्तक घेतलं. त्याचं नामकरण बिट्टू बॉस असं करण्यात आलं आहे. सरनाईक यांच्या चिरंजीवाचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसाचं औचित्य साधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दत्तक योजनेअंतर्गत या बिबळ्याच्या बछड्याला त्यांनी एका छोटेखानी सोहळ्यात दत्तक घेतलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading