वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी सांताक्लॉज उतरला रस्त्यावर

ठाणे वाहतूक पोलीसांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती जबाबदारीचे आहे याबाबत नाताळाचं औचित्य साधत सांताक्लॉजच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. वाहतुकीचे नियम न पाळल्यानं अपघात होत असतात. त्यामुळं सुरक्षित आणि विना अपघात प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळा असा सल्ला तीन हात नाक्यावर सांताक्लॉज वाहन चालकांना देताना दिसत होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचं पालन करणा-या वाहन चालकांना पोलीसांच्या या सांताक्लॉजने बक्षीसं दिली. तर ज्यांनी पालन केले नाही त्यांना दंड करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या १८ विभागांमध्ये १८ सांताक्लॉजच्या माध्यमातून अशी जनजागृती केली जाणार असल्याचं अमित काळे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading