ठाण्यात लघु न्यायसहायक प्रयोगशाळेचा शउभारंभ.

वाढत्या नागरीकरणासोबतच ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा व्यापही वाढला आहेया पार्श्वभूमीवर ठाण्यात लघु न्यायसहायक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.या लॅबचे उदघाटन आज न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलीस आणि पालघर पोलीस अधिक्षक कार्यालय या तीनही पोलीस कार्यालयांच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू आणि बायोलॉजिकल तसेच टॉक्सोलॉजिकल नमून्यांचे तत्काळ विश्लेषण व्हावे यासाठी ठाण्यामध्ये स्वतंत्र लघु न्यायसहायक प्रयोगशाळा चरईतील एमटीएनएल इमारतीत सुरु करण्यात आली आहे.या लॅबचे उदघाटन राज्याचे न्यायिक आणि तांत्रिक विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते जाले.याप्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना नगराळे यांनी,राज्यात आठ फॉरेन्सिक लॅब अस्तित्वात असून अतिरिक्त पाच मिनी फॉरेन्सिक लॅबना शासनाने मंजुरी दिली होती.त्यापैकी चौथी लॅब ठाणे येथे सुरु करण्यात आली आहे.याचा लाभ ठाणे शहर,ठाणे ग्रामीणसह पालघर जिल्ह्यातील पोलीस युनिटसाठी होणार असून गुन्ह्यातील नमुन्यांचे तात्काळ विश्लेषण करून दोन महिन्यांमध्ये अहवाल मिळू शकेल.असे सांगितले. यापूर्वी स्थानिक फॉरेन्सिक लॅब उपलब्ध नसल्याने मुंबई वा इतरत्र जावे लागत असे.त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यास लागणार विलंब टळणार असून तपास प्रलंबित राहण्याचे प्रमाण घटेल असा आशावाद पोलीस आयुक्त फणसळकर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading